वाचा कोण आहे हसन मुश्रीफांना नडणारा खाकी वर्दीतील पठ्ठया !

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत आज चांगलीच राडेबाजी पाहायला मिळाली. नगरसेवकांव्यतिरिक्त कोणत्याही नेत्याला महापालिकेत जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. भाजपने तांत्रिक मुद्दे काढल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे संख्याबळ असूनही, धाकधूक वाढली होती. महापौर निवडणुकीसाठी माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ हे महापालिकेत आले.

मात्र यावेळी डीवायएसपी सुरज गुरव यांनी त्यांना महापालिकेत प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्याला मुश्रीफ यांनी विरोध केल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. सुरज गुरव म्हणाले,”गडचिरोलीला जातो नाहीतर घरला जातो, पण भीती घालायची नाही. सायेब, आम्ही नोकऱ्या करतोय, राजकारण करत नाही, वर्दीवर यायचं काम नाही, तुम्ही घरला जा”

कोण आहेत सुरज गुरव ?

उपअधीक्षक सुरज गुरव यांचा परिचय

सुरज गुरव हे मूळचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे रहिवासी आहेत

सुरज गुरव 2013 मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले.

नाशिक ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केलं.

त्यानंतर त्यांनी जळगावमध्ये प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून कामाला सुरुवात केली

त्यानंतर सुरज गुरव कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झाले.

शाहूवाडीनंतर ते सध्या करवीर पोलीस उपअधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत

सध्या कोल्हापूर शहर प्रभारी उपअधीक्षक म्हणून त्यांच्याकडे कार्यभार आहे.

You might also like
Comments
Loading...