हसन मुश्रीफ यांची कोरोनावर यशस्वी मात; कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

HASAN MUSHRIF

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यासंदर्भात गुरुवार दि.१७ रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला होता. जिल्ह्याचा दौरा करून गेल्यानंतर हसन मुश्रीफ यांचा दुसऱ्याचं दिवशी कोरोना तपासणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता.

परंतु आता १० ते १२ दिवस कोरोनावर यशस्वी उपचार घेतल्यानंतर ना.मुश्रीफ हे कोरोना मुक्त झाले आहे. कोरोनातून बरे होऊन आलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कागलमध्ये काल जल्लोषात स्वागत झाले. गाडीतून उतरताच मंत्री मुश्रीफ यांनी ग्रामदैवत गैबी देवस्थानाचे दर्शन घेतले. व नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

गैबी चौकात ना.मुश्रीफ यांच्या समवेत लहान मुलांच्या हस्ते हवेत तिरंगी फुगे सोडून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्य बाजारपेठेतून रस्त्याच्या दुतर्फा उभारलेल्या माता-भगिनी व नागरिकांनी ना.मुश्रीफ यांच्या गाडीवर फुलांचा अक्षरशः वर्षाव केला. दि.१८ सप्टेंबर रोजी ना.हसन मुश्रीफ यांनी ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे, असं त्यांनी म्हटले होते. राज्याचे ग्रामविकास मंत्री व अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याचे समजताच कागल मतदार संघासह, जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते, समर्थक व मित्र मंडळींनी आनंद व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-