श्रद्धा कपूर हाजीर हो… कराराचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल

टीम महाराष्ट्र देशा: कपड्यांचे उत्पादन आणि डिझाइन करणाऱ्या एका कंपनीने सप्टेंबरमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिच्या ‘हसीना पारकर’ या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आता निर्मात्यांसह श्रद्धालाही पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

‘हसीना पारकर’च्या प्रमोशनदरम्यान एजेटीएम (AJTM) या फॅशन लेबलचा प्रचार न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती.