अहमदनगर : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिलेल्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी होती. मात्र त्याआधीच शेतकऱ्यांनी मोर्चाला सुरुवात केली असून तणाव निर्माण झाला आहे.
शेतकरी नवे तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत.ट्रॅक्टर मार्चच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.’आज ६० दिवस झाले शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनादरम्यान सुमारे ५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. वास्तविक हे तिन्ही कायदे रद्द करून हा प्रश्न संपवला पाहिजे होता. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघणे, हे फार दुर्दैवी आहे असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी हा प्रतिष्ठेचा किंवा अहंकाराचा प्रश्न न करता आंदोलन मिटवणे गरजेचे होते. कृषी कायद्यांना स्थगिती दिली, त्याऐवजी ते रद्द करायला पाहिजे होते व पुन्हा समजूत काढून ते करायचे होते. ते न करता केंद्र सरकारने हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- अर्थसंकल्पात घेण्यात येणार ‘राष्ट्रीय बँक’ स्थापनेचा निर्णय !
- जिल्हा नियोजन समितीच्या सन 2021-22 साठी 520.78 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी
- माझ्या कारकिर्दीत मनपाच्या शाळा सर्वोत्तम करणार; नागपूरच्या महापौरांचा निर्धार
- ‘शेतकरी मोर्चाला पब्लिसिटी स्टंट म्हणत शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या आठवलेंनी माफी मागावी’
- मोर्चात खरे शेतकरी कमी आणि मारुन मुटकून आणलेले लोकं जास्त होते; दरेकरांची टीका