तर अशा शिव्या देऊ की… रात्रभर झोप येयची नाही, मुश्रीफांचा पडळकरांना दम

hasan mushrif slams gopichand padalkar

कोल्हापूर: भाजप आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा वाद राज्यामध्ये पहायला मिळत आहे. पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्राला लागलेला कोरोना म्हणाल्याने राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पडळकरांवर खास कोल्हापूर स्टाईलने प्रहार केला आहे.

पडळकर यांच्या विधानाचे बोलवते धनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. एक दिवस आधी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील आपल्या मुलाखतीत शरद पवारांचा संदर्भ देतात आणि दुसऱ्याच दिवशी पडळकरांनी पवारांवर असं वक्तव्य करणं हा योगायोग नाही. यानंतर फडणवीस पडळकरांचं वक्तव्यं चुकीचं असल्याचं सांगतात. तसेच ते भावनेच्या भरात बोलल्याचं म्हणतात. चंद्रकांत पाटील त्यांच्याबाबत देखील अशी विधानं झाल्याचं सांगतात. मात्र, महाराष्ट्रात अशा प्रकारची विधानं कधीही झालेली नाहीत, असं मुश्रीफ म्हणाले आहेत.

आता शिव्यांची मालिका सुरु झाली आहे. आम्ही अशा ठेवणीतील शिव्या देऊ की त्यांना रात्रभर झोपा येणार नाही. त्यामुळे यांना रात्री जागून काढाव्या लागतील. अशी पद्धत या राज्यात सुरु झाली आहे. कायदा सुव्यवस्था देखील यामुळे अडचणीत येण्याची शक्यता असून त्याला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असतील, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मला व फडणवीस यांना काहीही बोलेले चालत का ?’ असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला होता. याला पुर्वाश्रमीचे भाजप नेते आणि आता राष्ट्रवादीत असणारे अनिल गोटे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपमधील नेत्यांचे बारसे अन्य कुणी करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही. आपापसातील व्देष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की, त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूप बारसे साजरे केले. देवेंद्र फडणवीसांना भाजपमधील विरोधी गटात असलेले अनेक नेते फडणवीसांना ‘टरबुज्या’ म्हणायचे, आता तर, तेच नामकरण सर्वश्रुत झाले, त्याला विरोधी पक्ष तरी काय करणार? असा टोला अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकात लगावला आहे.

IMP