महाडिकांच्या उमेदवारीत मुश्रीफांचा खोडा ?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने एक पाउल पुढे टाकत ६ संभाव्य उमेदवार निश्चित केले आहेत. मात्र आता राष्ट्रवादीची ही खेळी कुठेतरी त्यांच्याच अंगलट येताना दिसत आहे. कारण कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरुन वाद होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचं नाव संभाव्य यादीत असताना, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनीही या जागेवर लढण्यास इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे कुठेतरी महाडिकांच्या उमेदवारीत मुश्रीफांचा खोडा येण्याची शक्यता आहे.

तर खासदार धनंजय महाडिक यांच्या माहितीनुसार, “कोल्हापूरच्या लोकसभा उमेदवारीबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र, नाव निश्चित करण्यात आलेलं नाही.”

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील जागेवरुन लढण्याची इच्छा दर्शवल्याने कोल्हापुरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यात कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी धनंजय महाडिक यांच्याबद्दल नाराजीही पक्षापर्यंत पोहोचवली आहे. त्यात हसन मुश्रीफ यांनी या जागेवरुन लढण्याची तयारी दाखवल्याने शरद पवार यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

You might also like
Comments
Loading...