भुजबळांबद्दल वक्तव्य करण्याऱ्या चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी – हसन मुश्रीफ

mushrif - patil

कोल्हापूर : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मात्र, याआधी ३ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७७ जागांवर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.

या निकालानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांना बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं. ‘छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला,’ असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.

आता पाटलांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. परंतु ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब यांच्याबद्दल पाटील यांनी केलेले दर्पोक्तीयुक्त वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. जणूकाही जामीन कोर्टातून रद्द करणार, अशा आविर्भावात चंद्रकात पाटील वक्तव्य करत होते. भुजबळ साहेबांनी संपूर्ण हयात राजकारण आणि समाजकारणात काढली आहे. त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करण्याऱ्या चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या