राज्य सरकारची वाझेप्रमाणे ड्रग्ज माफियांकडूनही वसुली सुरु आहे का?- राम कदम

ram kadam

मुंबई : मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्यात आली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे प्रचंड चर्चेत आले. दरम्यान, वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते राम कदम यांनी राज्यसरकारवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधतांना कदम म्हणाले की,’वाझेप्रमाणे ड्रग्ज माफियांकडूनही वसुली सुरु आहे का? असा सवाल कदम यांनी राज्य सरकारला विचारला आहे. तसेच ‘समीर वानखेडे यांनी काही लोक पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे. ते कुठे जात आहेत याची माहिती घेतली जात असून गुप्तहेरगिरी सुरु आहे. हे लोक कोण आहेत ही माहिती समोर येत आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेच पोलिसांचा गैरवापर करत पाळत ठेवली आहे. हे खरं आहे का? या प्रश्नाचं उत्तर तिन्ही पक्षांना द्यावं लागेल’ असेही कदम म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘संपूर्ण देश, महाराष्ट्र ड्रग्जच्या विरोधात आहे. जे अधिकारी ड्रग्ज माफियांविरोधात, ड्रग्जविरोधात कारवाई करत आहेत त्यांची मदत करायची सोडून हे तीन पक्ष त्यांच्यावर तुटून पडत आहेत. काय कारण आहे ? कोण लागतात हे ड्रग्ज माफिया तुमचे ? एनसीबीचे अधिकारी कोणावर कधी कारवाई कऱणार याची माहिती तीन पक्षांच्या सरकारला कशाला हवी आहे? यांचे वागणं संशय निर्माण करतं. पूर्वी वाझे वसुली करत होता तशी वसुली या माफियांकडूनही सुरु आहे का? याचे उत्तर महाराष्ट्रातीलल जनतेला हवं आहे.’

महत्वाच्या बातम्या