आपली पोलिस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीये का ? – चित्रा वाघ

chitra wagh

मुंबई : दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकूण सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली. दिल्लीमध्ये काल 6 दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याची माहीती मिळाली अन् राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरूनच भाजपने यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘दिल्ली पोलिस येऊन मुंबईतली आतंकवादी पकडत आहेत. मग आपली पोलिस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीये का ?’ असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

राज्याचे गृहमंत्री या प्रकरणावर काय म्हणतात ?

यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य केलं असून संवेदनशील विषय असल्याने तपासाबाबत कोणताही खुलासा त्यांनी केलेला नाही. ‘पोलीस खात्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप केला जात नाही. पोलिसांना त्यांना सोयीप्रमाणे, प्रोफेशनल पद्धतीनुसार काम करण्यास परवानगी आहे. पोलीस राज्यात प्रोफेशनल पद्धतीनेच काम करतायत हे मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं,’ असं गृहमंत्री म्हणाले. यासोबतच, ‘पोलिसांना चौकशीबाबत संपूर्ण स्वातंत्र्य असून ते त्यांच्या पद्धतीनं तपास करत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करु द्यायला हवं. उगाच कुणी राजकारण करण्याची गरज नाही,’ असं प्रत्युत्तर देखील त्यांनी विरोधकांना दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या