fbpx

काँग्रेस रॅलीमुळे अॅम्ब्युलन्स दीड तास अडकली, नवजात बालकाचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : ‘काँग्रेसच्या रॅलीमुळे अॅम्ब्युलन्स दीड तास अडकून पडली होती. त्यामुळे आम्ही बाळाला वेळेत रुग्णालयापर्यंत पोहचवू शकलो नाही आणि त्यातच बाळ दगावलं’. असा आरोप मृत बालकाच्या काकांनी केला आहे. यामुळे हरयाणातील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर हरयाणात भाजप कॉंग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हा भाजपचा डाव असल्याचं म्हणत काँग्रेसनं हे आरोप फेटाळून लावले आहेत.

हरयाणा काँग्रेस अध्यक्ष अशोक तंवर यांनी बुधवारी एक राजकीय सभा आयोजित केली होती. सभेच्या आधी रोड शो करण्यात आला. ‘त्यामुळे सोनिपत ते रोहतक मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. याच दरम्यान एक अॅम्ब्युलन्स तब्बल दीड तास या गर्दीत अडकल्याच समोर येत आहे. यामध्ये नवजात बालक आणि कुटुंबीय होते. बालकाची तब्येत नाजूक असल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करणं गरजेच होत. परंतु दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रस्त्यात काँग्रेसचा रोड शो सुरू होता. आणि त्यामुळे अॅम्ब्युलन्सला पुढे जाण्यासाठी मार्ग मिळाला नाही. अनेक पर्यंत केले. शेवटी मुख्यमंत्र्यांशी संपर्क करण्याच ठरलं परंतु फोन लागला नाही आणि यात एक ते दीड तास वेळ गेला आणि बालकाचा मृत्यू झाला’, ही सर्व माहिती बालकाच्या कुटुंबीयांनी दिली.

कॉंग्रेसच स्पष्टीकरण आम्हाला त्या बालकाच्या मृत्यूचं दु:ख आहे. परंतु भाजप या घटनेचा गैरफायदा घेत आमच्यावर आरोप करत आहे. आम्ही आमच्या सभेतून केंद्रांतील आणि राज्यातील एनडीए सरकारचा खोटेपणा उघड केला. त्यामुळेच कॉंग्रेसवर आरोप होत असल्याच त्यांनी स्पष्ट केलं आहे.

…हे खरंच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? भाजप प्रवक्त्याचा पलटवार