का करतात हरतालिकेचा उपवास

hartilika poojan 2017

हरताळीकेचा उपवास हा स्त्रियांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. अनेक महिला हरितालिकेचे व्रत आवर्जून करतात. भाद्रपद शुल्क तृतीयेला हे व्रत केले जाते. हा उपवास सर्वप्रथम हिमालयाची मुलगी असणाऱ्या उमा( पार्वती) ने केला होता. ज्याचे फलस्वरूप भगवान महादेव त्यांना पती म्हणून लाभले. तेव्हापासून लग्न झालेल्या महिलांपासून तसेच कुमारिका देखील दरवर्षी हरितालिकेचे व्रत न चुकता करतात. निर्जळी किंवा न खाता हरितालिकेचे व्रत करण्याची प्रथा आहे. सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते.

कशी करतात पूजा

या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर  जागी चौरंग ठेवत. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी चौरंग सुशोभित केला जातो. यावर  पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करण्यात येते. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. “सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्रार्थना करून आरती केली जाते.