कुटुंबाच्या प्रगतीसाठी महिलांचे उत्तम आरोग्य गरजेचे-डॉ.कांचन शेकोकार

राहुरी / राजेंद्र साळवे : राहुरी फॅक्टरी येथे ‘ हरितालिका दिना ‘ निमीत्त डॉ.शेकोकार हॉस्पीटल मधे महिलांसाठी सर्व रोग निदान शिबिराचे अयोजन करण्यात आले होते. शिबिरात 140 महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.या शिबिरात महीलांची हिमोग्लोबिन , ब्लडशुगर, कार्ड़ीओग्राम , एंड़ोस्कोपी , या तपासण्या मोफत करण्यात आल्या. फक दरात शत्रकर्म व औषधोपचार देण्यात आले.

शिबिरात विशेष करून राहुरी पंचायत समिती च्या सभापती सौ.मनिषा ओहोळ यांनी हजेरी लाउन शिबिरात तपासणी करून घेतली व या दरम्यान औषधोपचार घेतले. शिबिरात सर्वप्रथम हरितालिका व्रताचे मान्यवरांचे हस्ते विधीवत पुजन करण्यात आले.पुजन प्रसंगी विशेष उपस्थिती मध्ये देवळाली प्रवरा नगरपरीषदेच्या नगरसेविका सौ.सुजाता कदम,अंजली कदम ,नंदाताई बनकर या हजर होत्या.

यावेळी शिबिराचे प्रास्ताविक मार्गदर्शन डॉ.शेकोकार हॉस्पीटलच्या संचालिका डॉ.सौ.कांचन शेकोकार यांनी केले.त्या म्हणाल्या की ,हरितालिका व्रताच्या निमीत्ताने यावेळी शिवलिंगाचे पुजन करण्यात आले.या दिवशी महिला एकत्र येउन आपल्या सुख दुःखाची देवान घेवान करतात त्याचाच एक भाग म्हणुन आज या शिबीराचे आयोजन खास महीलांसाठी करण्यात आले आहे.भारतासारख्या विकसनशील देशात आजची महीला ही सशक्त होणे फार गरजेचे आहे.महीलांना अनेक जबादा-या पार करत आपला संसाराचा गाड़ा चालवावा लागतो.

आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी महीलांचे आरोग्य हे सशक्त राहणे गरजेचे आहे ,याची दखल परीवारातील कर्त्या व्यक्तीने घेणे गरजेचे आहे.तरच चांगल्या समाजापासून आपल्या राष्ट्राची प्रगती होउ शकते.पाश्चात्य जीवनशैली व वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे महीलांना रक्तअल्पता पासुन ते कर्करोगापर्यंत टक्केवारी चिंताजनक प्रमाणात दीसुन येते.यासाठी महीलांनी आपल्या भारतीय संस्कृती नुसार आयुर्वेद व पंचकर्म च्या माध्यमातुन आरोग्याचे रक्षण करावे असे आवाहन केले.

प्रमुख अध्यक्षीय भाषणात नगरसेविका सौ.सुजाता कदम यावेळी म्हणाल्या की , डॉ.शेकोकार हॉस्पीटलच्या माध्यमातुन असे आरोग्य विषयक व महीलांच्या आर्थिक उन्नती साठी असणारे उपक्रम ते राबवितात त्यासाठी ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत. आपल्या परीसरात महिला एकत्री करणातुन सुसंस्कृत समाजाची निर्मिती साठी सर्वानी योगदान द्यावे असे आवाहन केले.सौ.अंजली कदम यावेळी म्हणाल्या की , संसाराची जबाबदारी पेलवताना सर्व क्षेत्रात आघाडी घेणे गरजेचे आहे.तसेच जि.प..सदस्य सौ.जनाबाई पैशे, राहुरी पं.स.सदस्य सौ.बेबीताई सोड़णार, सौ.ज्योती आढाव ,सौ.निता पवार आदी सदिच्छा भेट देउन गेल्या. रीसरातुन सौ.गीता विश्वास राव ,तृप्ती विश्वास राव ,वंदना कु-हाड़े,भगत राउत,पुजा कु-हाड़े,आरती कु-हाड़े,सोफिया अॅन्थोनी व महीला मोठ्या संख्येने हजर होत्या. आभार प्रदर्शन सौ.स्वाती गोसावी यांनी केल.