विजयसिंह मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील भाजपशी एकनिष्ठ राहणार…

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताचं कॉंग्रेस राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले नेते पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. मात्र या घरवापसी करणाऱ्या नेत्यांमध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील नसणार आहेत हे आज स्पष्ट झाले आहे.

फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांशी हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगल्याच्या प्रांगणात सुसंवाद साधला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. त्यामुळे हे दोन अनुभवी नेते देवेंद्र फडणवीस यांची साथ सोडणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे.

यावेळी फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे मनधैर्य वाढवले आहे. तसेचं हर्षवर्धन पाटील यांच्यापाठीशी मोठा अनुभव आहे. असा नेता आमच्यासोबत आल्याने त्यांच्या नेतृत्वाचा, अनुभवाचा पश्चिम महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रात पक्ष निश्चित उपयोग करून घेणार आहे, असे सूचक विधान केले आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे भाजपशी एकनिष्ठ राहणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

भाजपचे सरकार जाऊन तेथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार आल्याने मेगाभरतीत भाजपमध्ये गेलेले अनेक नेते परतीच्या वाटेवर आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र फडणवीस यांनी हर्षवर्धन यांच्यासाठीची ग्वाही घेतल्याने ते भाजपसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मोहिते पाटील यांनीही फडणवीस यांची साथ न सोडण्याचा निर्धार केल्याचे कार्यक्रमाच्या उपस्थितीवरून दिसून आले.

महत्वाच्या बातम्या