शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे हर्षवर्धन जाधव राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेत बंडखोरी करून औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभा लढलेले हर्षवर्धन जाधव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी प्रवेशासाठी जाधव यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचं बोलले जात आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता, यावेळी शिवसेना नेतृत्वाशी वाद झाल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. जाधव यांनी औरंगाबादमधून अपक्ष निवडणूक लढवली, त्यांच्या बंडखोरीमुळे २५ वर्षे शिवसेनेकडे असणाऱ्या मतदारसंघात एमआयएमला विजय मिळाला. या निवडणुकीत जाधव यांनी अडीच लाखांपेक्षा जास्त मतदान मिळवले, ज्याचा फटका शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना बसला होता.

Loading...

विधनासभा निवडणुक कोणत्या पक्षातून लढवायची हा प्रश्न जाधव यांच्यापुढे उभा राहिला आहे. आपले मित्र खा इम्तियाज जलील यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीकडून लढण्याचे प्रयत्न त्यांनी सुरु केले होते. मात्र एमआयएम आणि वंचितची युती तुटल्याने त्यांनी आपला निर्णय बदलला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्ह्यातील अवस्था चांगली नसली तरी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदार संघ व वैजापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे हर्षवर्धन जाधव आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करणार आहे, असं जाधव यांनी सांगितले आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

द्वेषाने भरलेला देश पुढील पिढयांच्या नशिबी नको : माजी IAS कन्नन गोपीनाथन