औरंगाबाद: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोवा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नागपूर येथे गेले आहेत. नागपूर भाजपने फडणवीस यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी रोड शो नंतर देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभाही झाली. गोवा तो झांकी है महाराष्ट्र अभी बाकी है, असा नाराही देवेंद्र फडणवीस यांनी सभेत दिला. दरम्यान, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी फडणवीस यांच्यावर खोचक शब्दात टीका केली.
“मी राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना आणि सर्वांचं सांगतो कि, तुम्ही सगळ्यांनी फक्त कंत्राटदार वाटून घेऊन तेरी भी चूप और मेरी भी चूप हे बंद करा कारण आज ना उद्या जनतेला हे सर्व कळणारच आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या रोड शो बद्दल विचारले असता रोड शो करायला अक्कल लागत नाही, पण फडणवीसांकडे अक्कल आहे परंतु प्रामाणिकपणा नाही असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या: