fbpx

हर्षवर्धन पाटलांचे पुत्र ‘राजवर्धन’ होणार राजकारणात सक्रिय

इंदापूर : पवार घराण्या पाठोपाठ आता जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ असणारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पुढील पिढी देखील राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. हर्षवर्धन यांचे पुत्र राजवर्धन पाटील हे सध्या वडिलांसोबत अनेक काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे येत्या काळात वडिलांच्या सोबतीने राजवर्धन देखील राजकीय आखाड्यात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे जिल्ह्याच्या राजकारणात हर्षवर्धन पाटील यांचे प्रस्थ राहिलेले आहे. संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वारे असताना देखील पाटील यांनी इंदापूरमध्ये काँग्रेसचे स्थान कायम राखले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पाटील यांच्यातीक सख्य जगजाहीर आहे. 2014 मध्ये मित्रपक्षानेच धोबीपछाड दिल्याने हर्षवर्धन पाटील हे काहीसे मागे पडल्याचं चित्र सध्या दिसून येते. मात्र, पाच राज्यांच्या निवडणुकीतील विजयाने काँग्रेस नेत्यांनी साडेचार वर्षातील मरगळ झटकत कामाला सुरुवात केली आहे. यामध्ये हर्षवर्धन पाटील मागे राहिलेले नाहीत. तसेच त्यांनी पुत्र राजवर्धन पाटील यांना देखील सक्रिय केले आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या, यावेळी राजवर्धन हे देखील उपस्थित होते. त्यामुळे वडिलांच्या सोबतीने पुत्र देखील राजकारण सक्रिय होणार असल्याची चर्चा सूरु आहे.