कॉंग्रेसचा ‘हा’ माजी मंत्रीही भाजपच्या वाटेवर ?

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभेचा तोंडावर काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. अनेक जन भाजप आणी शिवसेनेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. यामध्येच काँग्रेस मधील बडे नेते आणि राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे पुढच्या आठवड्यात भाजप मध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे. इंदापूरची जागा काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादी तयार नसल्याने हर्षवर्धन पाटील नाराज झाले आहेत.

इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पेच फसला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील या जागेवरून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र २०१४ पासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. इंदापूर मतदार संघातून सलग चार वेळा हर्षवर्धन पाटील हे निवडून आले होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन यांना पराभूत केले. त्यामुळे सहाजिकच राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदार संघावर दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान ही जागा राष्ट्रवादी न सोडल्यास हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादीने जागा न सोडल्यास हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पाटील यांनी देखील एका कार्यक्रमाला आमंत्रण देण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब भेट घेतली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशेच्या चर्चेला उधान आले आहे.

महत्वाच्या बातम्या