‘आमचा आमदार कुठेही फिरला तरी सायंकाळी एकाच्याचं घरी जोडे उचलतो’

blank

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान अनेक नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. इंदापूरचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आणि आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी निमगांव केतकीमध्ये स्मृती इराणी व गिरिश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या प्रचार सभेत ‘आमच्या येथील आमदारांनी पाच वर्षात तुम्हालाही फसवलं, येतो येतो म्हणाले मात्र आले काय नाहीत. हा गडी इतका चतुर आहे दिवसभर कुठेही फिरला तरी सायंकाळी एकाच्याचं घरी जावून जोडे उचलतो म्हणत दत्तात्रय भरणे यांच्यावर तोंडसुख घेतले आहे.

पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी आमच्या कोणत्याही मोठ्या मागण्या नाहीत. आपण केवळ पाणी प्रश्नाकडे लक्ष द्या असं म्हणत जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांकडे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली. दबावामध्ये आयुष्यातील पंधरा वर्षे गेली तर जगदाळेंचीही दहा वर्षे गेली. आता मात्र भाजपात आल्यावर मोकळं वाटायला लागले असल्याचाही खुलासा हर्षवर्धन पाटलांनी केला.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी ही जागा कॉंग्रेसला सोडत नसल्याचं लक्षात येताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. ते सध्या प्रचारात व्यस्त आहेत.

महत्वाच्या बातम्या