खड्डे बुजवायला पैसे नाहीत ते राज्य काय चालविणार ? – हर्षवर्धन पाटील

टीम महाराष्ट्र देशा: ज्या सरकारला साधा रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवता येत नाही, जर खड्डा बुजवलाच तर त्याचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांनी काय राज्याचा विकास केला? समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करुन, लोकांच्या भावना भडकावून किती दिवस राज्य चालविणार, असा टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा सरकारला लगावला आहे.

पंढरपूर येथे खासगी कामानिमित्त आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, डॉ. सुधीर शिनगारे उपस्थित होते.