इंदापूरच्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील माझ्याकडे तिकीट मागत आहेत : महादेव जानकर

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत इंदापूरच्या उमेदवारीवरून कॉंग्रेस आघाडीत बिघाडी होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. तर इंदापूर कॉंग्रेसचे माजी आ. हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यात वैर आहे. अशी काही वादाची परिस्थिती असताना रासपचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जाणकार यांनी धक्कादायक विधान केले आहे. हर्षवर्धन पाटील गेले अनेक दिवस माझ्याकडे तिकीट मागायला येत आहेत, असे म्हणत जानकर यांनी गौप्यस्फोट केला आहे.

Loading...

महादेव जानकर यांच्या या विधानानंतर हर्षवर्धन पाटील नक्कीच भाजपात प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे. कारण लोकसभा निवडणुकीलाचं हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच बोललं जात होत. मात्र कॉंग्रेस श्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतर आणि पवार कुटुंबियांच्या आश्वासनाला बळी पडून पाटील यांच्या पक्षांतराचा विषय बाजूला पडला. मात्र आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपात जाणार असल्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे.

विधानसभेला तरी राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडेल, या आशेवर हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंना मदत केली होती. मात्र लोकसभेच्या दगडा खालून हात निघताचं पवार कुटुंबीयांनी विधानसभेचे गाजर दाखवून हर्षवर्धन पाटील यांना फसवल असल्याचं बोललं जात आहे. निवडून आलेले आमदार हेच आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र राहणार असल्याचं पवारांनी म्हटलंय. त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

तसेच राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना पराभूत केले होते. त्यामुळे 2014 साली निवडून आलेला आमदार हेच आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र राहीलं असं, पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

कोल्हापूर जिल्ह्यात युतीच्या सर्व जागा निवडून आणू, चंद्रकांतदादांचा दृढनिश्चय

भाजप युवामोर्चा अध्यक्षाची मनपा अभियंत्यास मारहाण

. . .आणि आठच दिवसांत मी मुख्यमंत्री झालो- शरद पवार

मुंबईकरांचे होणार हाल, बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा संपाचा निर्धार

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?