मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेला ‘हा’ आमदार खैरेंच्या विरोधात लढवणार लोकसभा !

औरंगाबाद : शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढणार आहेत. तशी त्यांनी आतापासून तयारी केली आहे. शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला जोरदार टक्कर मानली जात आहे.

कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जाधव उपोषणाला बसले होते. सरकारने लवकरात लवकर मागण्या कराव्यात यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यावरून एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर पक्षातून तंबी दिल्यानंतर जाधव यांना माघार घ्यावी लागली होती.
त्यामुळे नाराज झालेल्या हर्षवर्धन जाधव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली होती. अखेर आता जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकलाय आणि आपल्या नव्या पक्षाची घोषणा करत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय.

सामाजिक समरसतेसाठी मराठा समाजासह 18 पगड जातींच्या प्रतिनिधींची जाधव यांनी बैठक घेतली आणि त्यानंतर सामाजिक समता निर्माण कऱण्यासाठी नवा पक्ष काढणार असल्याचं त्यांनी सांगितले. येत्या दीड महिन्यात हा नवा पक्ष स्थापन होणार आहे. मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका यावेळी जाधव यांनी मांडली.

bagdure

मराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार, आजपासून पुण्यात बेमुदत आंदोलन

उदयनराजे कोणत्याही पक्षात असो आमचा पाठींबा कायम : सुरेश पाटील

You might also like
Comments
Loading...