हर्षवर्धन जाधव शिवस्वराज्य पक्षा अंतर्गत सहा ठिाकाणी देणार उमेदवार, राष्ट्रवादीत प्रवेश नाही

औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचे निकाल बदलणारे शिवस्वराज पक्षाचे हर्षवर्धन जाधव आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षातर्फे स्वतंत्रपणे औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात सहा जागा लढविणार आहे. शहरातील तीन आणि कन्नड,गंगापूर आणि वैजापूर अशा सहा जागा असणार आहेत. अशी माहिती हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामूळे जाधव यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाच्या चर्चेला आतापुर्ण विराम मिळाला आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत कुठल्यातरी राजकीय पक्षासोबत जावे असा मत प्रवाह काही कार्यकर्त्यांचा होता. त्यानूसार शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपशी आमची चर्चा सुरू होती. पण ज्या उद्देशाने मी स्वःताचा शिवस्वराज्य बहुजन पक्ष काढला होता, तो बाजूला ठेवून राजकीय स्वार्थासाठी एखाद्या पक्षात जावे हे माझ्या मनाला पटत नव्हते, आणि म्हणून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्वःताच्या ताकदीवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली.

कन्नडचे माजी आमदार असलेले हर्षवर्धन जाधव यांनी तीन महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा राजिनामा देत शिवस्वराज पक्षाच्या माध्यमातून निवडणुक लढवत 3 लाखा पर्यंत मते घेतली होती. हर्षवर्धन यांनी मिळालेल्या मतांमूळे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव होते,एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत किंग मेकरची भूमिका बजावणारे हर्षवर्धन जाधव आता विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाची ताकत आजमावणार आहेत.

पक्षातर्फे कन्नड मतदारसंघातून स्वत: हर्षवर्धन जाधव निवडणुक लढविणार आहे. यासह औरंगाबाद पुर्व, पश्चिम आणि मध्य या तीनही जागेवरून निवडणुक लढविणार आहे. यासह लोकसभेत गंगापुर आणि वैजापुरातून हर्षवर्धन यांना मोठी लिड मिळाली होती. यामूळे गंगापूर आणि वैजापुरलाही उमेदवार देत निवडणुकीत आपले निशीब आजमावणार आहेत. विधानसेभेच्या निवडणुकीत शिवस्वराज पक्षा कोणालाही पाठिंबा देणार नाही,आणि कोणाचा पाठिंबाही घेणार नसल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केले.