…तर तुमचे व्हिडिओ बाहेर येतील, दानवेंना जावायाची थेट धमकी

harshvardhan jadhav

कन्नड : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे चांगलेच चर्चेत आले होते. आता हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्यावरच गंभीर आरोप करत धमकी दिली आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी कुटुंबातील कलहावर भाष्य केले आहे. या व्हिडिओद्वारे जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं काय म्हटलं आहे जाधव यांनी

‘मी स्वबळावर निवडणूक लढलो होतो आणि निवडून आलो होतो. तुम्ही नरेंद्र मोदींचा चेहरा फोटोवरून बाजूला काढून निवडणूक लढवून दाखवा. भाजप पक्ष सोडून निवडणूक लढवून दाखवा, तुम्हाला तुमची जागा कळेल. तुम्हाला वाटतं मी फार फडफड करतोय. याला कुठेही धरून कापून टाकू, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे छक्के पंजे असलेले अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहे. हे सर्व व्हिडिओ बाहेर काढले. हे व्हिडिओ वकिलांना पाठवले आहे अशी धमकीच जाधव यांनी दिली आहे.

तुमच्या मुलीसोबतचे वैवाहिक संबंध सुधारण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केला. पण तुम्ही तिची समजूत घालण्याऐवजी उलट मलाच धमक्या दिल्या. तुम्ही सत्तेत असल्यानं काहीही करू शकता. तुम्ही आधीच मला खूप त्रास दिला आहे. त्यामुळेच मी कोच्चीनला निघून जात आहे. तिथेही येऊन तुम्ही काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केलात, तर माझ्याकडे असलेल्या सायनाईडच्या गोळ्या खाऊन मी आत्महत्या करेन, अशी धमकी जाधव यांनी दिली आहे.

तुम्ही कायम मला त्रास दिला. तरीही मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तुम्ही कायम मला हीन वागणूक दिलीत. त्याचा मला कंटाळा आला आहे. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात. तुम्ही मला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास मी खरंच आत्महत्या करेन. पण त्यानंतर तुमचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतील. त्यानं काय होईल याचा विचार करा. मी तुमचे सगळे व्हिडीओ नामांकित वकिलांकडे देऊन ठेवले आहेत. ज्या दिवशी माझा जीव जाईल, त्या दिवशी ते व्हिडीओ व्हायरल होतील.

#coronavirus : गेल्या २४ तासांमध्ये ७,९६४ नव्या रुग्णांची भर

संन्यास घोषित करताना जाधव काय म्हणाले होते ?

लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती मी करतो.

प्रत्येक घरात वाद होत असतात. पण त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. मी संजना जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रावसाहेब दानवेंच्या आशिर्वादाने आणि नेतृत्त्वाखाली संजना जाधव उत्तुंग भरारी घेतील याबाबत मनात शंका नाही. आपण सर्वांना राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क साधावा.

यापुढे वीजपुरवठा सतत खंडित होणं अधिकाऱ्यांना पडणार महागात