महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविल्याबद्दल हर्षवर्धन सदगीर यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

blank

मुंबई : कुस्तीतील ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकाविल्याबद्दल कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. हर्षवर्धनच्या पाठीवर शाबासकीची थाप ठोकून मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्याचे कौतुक केले.

कुस्तीपटु हर्षवर्धनने आज मंत्रालयात मुख्यमंत्री ठाकरे यांची ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेसह भेट घेऊन आपल्या यशाची माहिती दिली.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कॉर्पोरेशनतर्फे घेण्यात आलेल्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर विजेता ठरला.

लातूरच्या शैलेश शेळके आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या काका पवारांच्या दोन्ही पठ्ठ्यांनी फायनलमध्ये धडक मारली होती. या दोघांमध्ये मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्यात लढत झाली आणि या लढतीत हर्षवर्धन सदगीर हा झाला आहे.गतवर्षीचा विजेता बाला रफिक शेख आणि उपविजेता अभिजीत कटके या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे महाराष्ट्राला यंदा नवा महाराष्ट्र केसरी मिळाला आहे.