fbpx

हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन

पुणे : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील (वय ७५) यांचे निधन झाले.

गेल्या पंचवीस दिवसापूर्वी फुफ्फुसाच्या संसर्गाचा त्रास होण्यास सुरवात झाल्याने उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केले होते. आज मंगळवार (ता.१५) रोजी निधन झाले.

रत्नप्रभा पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य व दुध संघावरती संचालक म्हणून कार्यरत होते.त्यांच्या पाठीमागे मुलगा हर्षवर्धन, मुलगी चित्रा कोरटकर (वकीलवस्ती,बावडा) व चेतना मोटे (श्रीगोंदा) असा परिवार आहे. बुधवार (ता. १६) रोजी सकाळी सात ते दहा वाजता बावडा (ता.इंदापूर) येथील रत्नाई निवासस्थानामध्ये अंत्यदर्शनासाठी पार्थीव ठेवण्यात येणार असून होणार असून शहाजीबाग येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.