दानवेंसह संपूर्ण भाजपचा मलाच पाठींबा; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने खळबळ

टीम महाराष्ट्र देशा- ‘जावई बापू काळजी करू नका. संपूर्ण भाजप तुमच्या पाठिशी आहे. असे रावसाहेब दानवे यांनी आपल्या पत्नीला सांगितले असल्याचा खळबळजनक दावा अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.जाधव यांनी बजरंग चौकात आयोजित केलेल्या सभेत बोलताना केलेल्या या दाव्यामुळे सेना-भाजपमध्ये संशयाची मोठी भिंत तयार झाली आहे.

नेमकं काय म्हाणाले हर्षवर्धन जाधव ?

‘मला शांत बसवा म्हणून खैरे माझ्या सासऱ्याच्या मागे लागले आहेत. मात्र, जावई बापू काही काळजी करू नका. संपूर्ण भाजप तुमच्या पाठीशी आहे, असे रावसाहेब दानवे यांनी आपल्या पत्नीला सांगितले आहे. बायकोने मला हातात गंडा दोरा घातला आहे. माझ्यावर काहीही बोलतो असा आरोप केला जातो. मी जे बोलतो ते खरे बोलतो. जनतेसाठी मेंटल झालो, माथेफिरू झालो असे म्हटले तरी मला काहीही वाटणार नाही.