आमदारकीचा नवस पुर्ण करण्यासाठी रश्मी बागल ‘देव’ बदलणार…?

हर्षल बागल : राष्ट्रवादी काँग्रेसच्या करमाळा तालुक्याच्या नेत्या रश्मी बागल – कोलते या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते व दिग्विजय बागल यांचा एकत्र फोटो टाकत त्याचे मेसेज देखील व्हायरल होऊ लागलेत. सोमवारी यावर तातडीची बैठक देखील या मेसेजमधुन बोलवली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कुर्डूवाडी येथील हल्लाबोल यात्रेच्या सभेतच रश्मी बागल यांचे तिकिट जाहिर केले होते. मग रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी का देत आहेत याचे संशोधन कार्यकर्ते व पक्ष पदाधिकारी यांनी केले पाहिजे. पक्ष आपल्या कामाची कदर करित नाही अशा आशयाच्या पोस्ट त्यांच्या नजदिकच्या कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.

पक्षनिष्ठेच्या संदर्भात रश्मी बागल यांनी लोकसभेला निवडणुकित माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटिल यांना ऊद्देशन टोला मारला होता, की नवस पुर्ण करण्यासाठी आम्ही देव बदलत नाही. मग आपण आज आमदारकीचा नवस पुर्ण करण्यासाठी देव नाही तर थेट मंदिर देखील बदलणार आहात या चर्चांना ऊधाण आहे .जर रश्मी बागल आपण खरोखरच पक्षांतर केले तर तुम्ही व देव बदलणाऱ्यांमध्ये काय फरक राहिला. पक्षनिष्ठेवरुन मोहिते पाटिल व संजय शिंदे यांच्यावर टिका करण्याचा अधिकार तुम्हाला काय म्हणुन आहे. असाही सवाल निर्माण होत आहे .

एक काळ असा होता की रश्मी बागल यांचे वडिल दिवंगत दिंगबरराव (मामा) बागल हे खासदार शरद पवार यांच्या अगदी जवळचे निकटचे म्हणुन राज्याला परिचत होते. त्यांनी पवार यांच्या मंत्रीमंडळात सामाजिक न्यायमंत्री म्हणुन कार्य केले होते. आमदार म्हणुन कार्य देखील कौतुकास्पद होते. शेतकरी कामगार पक्षाची विचारसरणी देखील होती.

अशा कर्तृत्वावान नेत्याच्या पोटी आपण जन्म घेतला. दिंगबर मामांच्या अकाली निधनानंतर आपल्या मातोश्री सौ श्यामल (मामी) बागल यांना २००९ साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर शरद पवार यांनी विजयी करित पुन्हा राजकीय रित्या स्थिर केले. आपण राजकारणात परिपक्व होताच पुन्हा २०१४ साली राष्ट्रवादीने करमाळ्याचे तिकिट आपणास दिले पण विजय हातातुन थोडक्यात निसटला हे दुर्देव…

राष्ट्रवादीने सोलापुर जिल्हा बँकेवर संचालक म्हणुन देखील घेतले. करमाळा मार्केट कमिटी व मकाई व आदिनाथ सारखे मोठे दोन सहकारी साखर कारखाने एवढं मोठं एैश्वर्य पवार साहेबांमुळे आपल्याकडे एैवढ्या कमी वयात जवळ आहेत. आपण राष्ट्रवादी पक्षाच्या प्रांतिक सदस्या देखील आहेत मग काय म्हणुन आपण राष्ट्रवादीला रामराम करित सेनेला जय महाराष्ट्र करित आहेत.

खासदार शरद पवार जेव्हा जेव्हा माढा करमाळा दौऱ्यावर येत असत तेव्हा तुम्हाला पवार साहेबांनी गाडीत बसवत समोरची सिट दिलेली आहे याचा विसर पडलेला नसावा … आपणास पक्षांअतर्गंत झालेल्या त्रासावर पवार यांनी अनेकवेळा तोडगा काढलाय हे आपणास व विरोधकांना ही माहित आहे. पण नवस पुर्ण करायचा असेल तर संघर्ष पुर्ण करावाचं लागतो म्हणुन नवस पुर्ण करण्यासाठी थेट देव आणी मंदिर बदलुन चालत नाही. त्यासाठी राजकारणातल्या शरद पवार नावाच्या देवावर श्रध्दाचं पाहिजे.

खरं तर करमाळा हे रश्मी बागल यांचे माहेर असुन शरद पवार यांच्या पुढाकाराने सासवड येथील साखर महा संघाचे माजी अध्यक्ष तसेच ऊद्योजक विजय कोलते यांचे चिरंजीव ऊद्योगपती गौरव कौलते यांच्याशी विवाह सपंनन झालेला असुन माहेरातच त्यांनी राजकारणात स्थिरावण्याचा सातत्याने प्रयत्न केला माहेरच्यांनी देखील पदरात घेतले व सासरच्यांनी देखील साथ दिली.

पण पक्षाने दखल घेतली नाही व साथ दिली नाही ही नेहमी खंत त्यांनी व्यक्त होत आहे . करमाळ्यात पक्षापेक्षा गटाला नेहमीच महत्वं जास्त दिले जाते अन आत्ता बागल गट सेनेत गेल्याने सेनेची ताकद वाढली तर आमदार नारायण पाटिल यांची ऊमेदवारी धोक्यात आहे हे स्पष्ट आहे . तर राष्ट्रवादीचे रान संजय शिंदे यांना मोकळे झाले आहे.

प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टिका करताना जरा संभाळुनच टिका करावी कारण एक दिवस असा येतो की ज्यावर टिका केली त्यालाच पक्ष टिकिट देतो अन त्याचा प्रचार करण्याची नामुष्की निष्ठावंत कार्यकर्त्यावर येतो हे वास्तव आहे. त्यामुळे आगामी काळात रश्मी बागल आ नारायण पाटिल व संजय शिंदे हे कोणत्या पक्षातुन निवडणुक लढवतात हे अजुन गुलदस्त्यात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकमेकांची ऊणीदुणी काढताना जरा संभाळुंनच काढावी… नाहीतर हेच नेते रात्री एकत्र जेवन करतात व सकाळी कार्यकर्ते सतरंज्या हाथंरतात हा इतिहास आहे.