महाराष्ट्र देशा डेस्क: आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत लग्नाची घोषणा केली. ही घोषणा केल्यानंतर काही वेळातच ललित मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा डीपी आणि बायो दोन्ही बदलले. तसेच त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी सुष्मिताला बेटर हाफ म्हटले. त्यानंतर एकीकडे ललित आणि सुश्मिता यांच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या, तर दुसरीकडे मिम्स व्हायरल व्हायला सुरुवात झाली. अशातच उद्योगपती हर्ष गोयंका यांचे एक मजेदार ट्विट आणि त्यावर तृणमूल काँग्रेसचे नेते किर्ती आझाद यांनी दिलेला रिप्लाय हे चर्चेचा विषय बनले आहे.
I rang up Lalit and asked him how did he manage?
He gave me a SENsational answer “Modi hai tho mumkin hai!”
— Harsh Goenka (@hvgoenka) July 15, 2022
हर्ष गोयंका या ट्विटमध्ये म्हणतात, “मी ललितला फोन केला होता आणि त्याला विचारलं की तुला हे कसं जमलं? तर तो मला ‘सेन’सेशनल उत्तर देत म्हणाला, “मोदी है तो मुमकिन है”. गोयंका यांच्या या मजेशीर ट्विटवर तृणमूल काँग्रेसचे नेते किर्ती आझाद यांनी ट्विट करत रिप्लाय दिला कि, “सुष्मिताचं काय होणार हे तर माहित नाही. मात्र भारताचं जे काही होत आहे त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे”. या रिप्लायवर पुन्हा गोयंका यांनी खास शैलीत ट्विट केले कि, “मोदींनी यंदा बंगालवर विजय मिळवला”. सुष्मिता सेन हि बंगाली असण्याचा संदर्भ त्यांनी या ट्विटमध्ये दिला आहे. तर त्यांनतर पुन्हा गोयंका यांनी सुष्मिता आणि ललित यांचा एक फोटो ट्विट करत “मिस इंडिया आणि मिसिंग इंडिया” असे कॅप्शन दिले आहे. आता या सर्व ट्विटवर नेटकऱ्यांचे भन्नाट रिप्लाय येत आहेत.
Miss India + Missing India pic.twitter.com/GNtPKZQaZi
— Harsh Goenka (@hvgoenka) July 15, 2022
सुष्मिताच्या वडिलांची प्रतिक्रिया
सुष्मिताचे वडील शुबीर सेन यांना पत्रकारांनी सुष्मिताच्या नात्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “मला याबद्दल काहीही माहिती नाही. मी माझ्या सुष्मिताशी सकाळीच बोललो, पण तिने काहीही सांगितले नाही. तुम्ही मला याबद्दल सांगितले तेव्हा मी ते ट्विट पहिल्यांदा पाहिले. मला काही माहिती नसल्यामुळे आता काय बोलावे ते मला समजत नाही.”
महत्वाच्या बातम्या:
- Amol Mitkari : “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आपले सरकार ताम्रपट घेऊन…”, राष्ट्रवादीचा शिंदे सरकारला टोला
- Cabinet Decision | औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण ; मुख्यमंत्र्यांची माहिती
- Raj Kundra | राज कुंद्रा करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण; तुरुंगातील अनुभव पडद्यावर दाखवणार
- Kirit Somaiya | हात जोडतो, पण आता तरी मेट्रोचं काम होऊ द्या – किरीट सोमय्या
- Prakash Ambedkar : “यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी”, प्रकाश आंबेडकरांची मागणी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<