हर्ष आणि भारतीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

हर्ष

मुंबई : गेल्या 2 आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाड सत्र सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. आता ड्रग प्रकरणात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह हिच्या अटकेनअतंर आता तिचा पती हर्ष लिंबाचिया याला देखील एनसीबीने (NCB) अटक केली.

शनिवारी भारतीला अटक करण्यात आली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून हर्ष लिंबाचिया याची जवळपास 18 तास चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे. एनसीबी अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली होती. आज भारती आणि हर्ष दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये दोघांनीही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे कबुल केले होते.

आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. तब्बल 18 तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने हर्षला अटक केली होती. कॉमेडियन भारती आणि तिचा हर्षला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.  4 डिसेंबरपर्यंत दोघांनाही न्यायलयीन कोठडी.

महत्वाच्या बातम्या