हरमनप्रीत वादळाचा ऑस्ट्रेलियाला तडाखा 

वेबटीम : महिला विश्वचषकात भारतीय महिलांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत माजी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघावर मात केली आहे. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी मात करत रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याचं तिकीट बूक केलं. हरमनप्रीत कौर च्या धडाकेबाज 171 धावांच्या जोरावर विजय मिळवत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आता रविवारी मिताली राजच्या टीम इंडियाची गाठ यजमान इंग्लंडच्या महिला संघाशी पडणार आहे.
जागतिक महिला वन-डे क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल, तर भारतीय संघ चौथ्या स्थानी आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील ४२ पैकी ३४ लढतींत पराभव पत्करावा लागला आहे. या वर्ल्ड कपच्या साखळी लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताला नमविले होते. या सर्व बाजू भारतीय महिलांच्या विरुद्ध होत्या. पण भारतीय महिलांनी जबरदस्त खेळ करून ऑस्ट्रेलियाला नामोहरण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना निकोल बोल्टन, बेथ मूनी आणि कॅप्टन मेग लॅनिंग झटपट माघारी परतल्याने ऑस्ट्रेलियाची ३ बाद २१ अशी स्थिती झाली. यानंतर पेरी आणि एलिस विलानी यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. राजेश्वरी गायकवाडने विलानीला बाद करून भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. विलानीने ५८ चेंडूंत १३ चौकारांसह ७५ धावा केल्या. ही जोडी फुटली आणि ऑस्ट्रेलियाची ४ बाद १२६ वरून ९ बाद १६९ अशी स्थिती झाली. अॅलेक्स ब्लॅकवेलने तळाच्या बीम्सच्या साथीने भारताचा विजय लांबवला. ब्लॅकवेलने ५६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ९० धावा केल्या. दीप्तीने ब्लॅकवेलचा त्रिफळा उडविला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी , भारताने टॉस जिंकताना पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीत कौरच्या नाबाद १७१ धावांच्या जोरावर भारताने २८२ धावांचे भलेमोठे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले.
दरम्यान,प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिलांची निराशाजनक सुरुवात झाली.सलामीवीर स्मृती मानधना(६)अाणि पूनम राऊत(१४)झटपट बाद झाल्या.त्यांना सामन्यात लय गवसली नाही.त्यामुळे त्या अपयशी ठरल्या.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अालेल्या हरमनप्रीत काैरने संघाचा डाव सावरला.यादरम्यान तिला कर्णधार मितालीची महत्त्वाची साथ मिळाली.या दाेघींनी तिसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचली अाणि संघाच्या धावसंख्येला गती दिली.दरम्यान,कर्णधार मितालीने सामन्यात ६१ चेंडूंत ३६ धावांची खेळी करून तंबू गाठला.
भारताकडून फाॅर्मात असलेल्या हरमनप्रीत काैरने मैदानावरची अापली झंझावाती खेळी शेवटपर्यंत कायम ठेवली.या वेळी तिला दीप्तीने माेलाची साथ दिली.त्यामुळे या दाेघांना चाैथ्या विकेटसाठी १३७ धावांची माेठी भागीदारी रचता अाली.त्यामुळे टीमच्या धावसंख्येला गती मिळाली.दीप्तीने ३५ चेंडूंत २५ धावांचे याेगदान दिले.त्यानंतर वेदा कृष्णमूर्तीनेही शानदार साथ दिली.
१९८३ च्या वर्ल्डकपमधील कपिलच्या खेळीला उजाळा
महिला फलंदाज हरमनप्रीतने गुरुवारी अापल्या खेळीतून १९८३ मध्ये पुरुषांच्या वर्ल्डकपमधील कपिलदेवच्या झंझावाताला उजाळा दिला. त्या वेळी करा वा मरा असलेल्या सामन्यात कपिलदेवने १३८ चेंडूंत १६ चाैकार अाणि सहा षटकारांसह नाबाद १७५ धावा काढल्या हाेत्या.अाता हरमनप्रीतने ११५ चेंडूंत २० चाैकार अाणि ७ षटकारांच्या अाधारे नाबाद १७१ धावांची खेळी केली.