हरमनप्रीत कौरची डिग्री वादात डीएसपी पद जाणार?

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय महिला टी-20 क्रिकेट संघाची कर्णधार ‘हरमनप्रीत कौर’ ची शैक्षणिक डिग्री वादात सापडली आहे. त्यामुळे पंजाब पोलिसातील डीएसपी पदावरून तिला हटवलं जाण्याची शक्यता आहे. चौकशी दरम्यान ‘हरमनप्रीत कौर’ची बीए ची डिग्री बोगस असल्याचं आढळून आलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे हरमनप्रीतला या आधी रेल्वेनेही नोकरी दिली होती. पण हरमनप्रीत कौर ला पोलिसात काम करण्याची इच्छा होती. आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केल्याने हरमनप्रीतला पंजाब पोलिसमध्ये डीएसपी पद देऊन सन्मानित करण्यात आलं होत.

हरमनप्रीतची बीएची डिग्री बोगस आढळल्यानंतर आता पोलिसांनी तिला पत्र लिहिलं आहे. ‘तुझं शिक्षण 12 वी पर्यंतच झालं आहे, त्यामुळे तुला कॉन्स्टेबलची नोकरी मिळू शकते,’ असं या पत्रात पंजाब पोलिसांनी म्हटलं आहे. यावर हरमनप्रीतच्या मॅॅनेजरने स्पष्टीकरण देताना ते म्हणाले ‘पंजाब पोलिसांकडून आम्हाला अजूनपर्यंत कोणतंही अधिकृत पत्र आलेलं नाही’.

हरमनप्रीत कौर ने 87 वन-डे सामन्यांत 35.41 च्या सरासरीने दोन हजार 196 धावा तिने केल्या आहे. तर 83 टी-20 सामन्यांत 27.86  सरासरीने 1616 धावा केल्या आहेत.

मुंबई पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागण्याची शक्यता!