राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश, काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा केला पराभव

टीम महाराष्ट्र देशा – राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) हरिवंश नारायण सिंह यांचा विजय झाला आहे. सिंह यांना १२५ मते पडली तर संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA)च्या बी.के.हरी प्रसाद यांना १०५ मते मिळाली. विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंह यांचे सभागृहात अभिनंदन केले.

राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिवंश नारायण सिंह यांची निवड झाली आहे. सगळ्या खासदारांवर आता हरीकृपा राहिल असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. दोन्हीकडे हरी होते. मात्र हरिवंश नारायण यांचा विजय झाला याचा मनस्वी आनंद झाला असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी परवडले पण …