मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चढाओढ सुरु असताना पाहायला मिळत आहे. त्यात आता ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांनी आज संजय राऊत यांची भेट घेऊन ही मागणी केली. यांनतर माध्यमांशी बोलताना हरिभाऊ राठोड यांनी आपले मत मांडले आहे.
पत्रकारांशी बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले, निवडणुकीला शिवसेनेला पाठिंबा दिला होता. माझ्या स्वतंत्र सभा १० ते १२ लागल्या. त्यात काँग्रेसचे उमेदवार पडले. मुख्यमंत्री शिवसेनेचे पाहिजे होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे. मित्र पक्ष म्हणून आमचा हक्क आहे. उद्धव साहेबांना निरोप द्या एवढेच संजय राऊत यांना सांगितले. आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आपण निवडून आलात मुख्यमंत्री झालात. आता आमचा विचार केला नाही तर जय महाराष्ट्र.
महत्वाच्या बातम्या –