मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिन म्हणून साजरा होणार हरिभाऊ बागडेंचा वाढदिवस

औरंगाबाद: विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे 17 ऑगस्टला 74 व्या वर्षांत पदार्पण करणार आहे. आधीच त्यांच्या वयावरून त्यांना फुलंब्री मतदारसंघातून आगामी विधानसभेचे तिकिट न देणार नसल्याची चर्चा होत आहे.अशातच मतदारसंघातील कामाच्या माध्यमातून बागडे पुन्हा विधानसभेची तयारी करू लागले आहेत. यातून आगमी वाढदिवस हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. असे आवाहन बागडे समर्थकांतर्फे केला जात आहे.

कोल्हापूर-सांगलीतील पुरग्रस्तांना मदतीसाठी हे आवाहन करण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्रकही काढण्यात आले आहे. या दिनानिमित्ताने वाढदिवसाच्या जाहिरात व इतर गोष्टींवर होणारा खर्च हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला जाणार आहे. कार्यकर्त्यांनी ते करावे असे सांगण्यात आले आहे. या माध्यमातून विधानसभा कार्यक्षेत्रात एक कोटी रुपयांचा दिले जाणार आहेत. वाढदिवसा निमित्ताने औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील सागर रिसोर्ट येथे पुरग्रस्तासाठी मदत निधी दिला जाणार आहे.

हरिभाऊ बागडे यांच्या वयामूळे आगमी निवडणूकीत तिकिट नाकरले जाणार असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर भाजप मधील इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली. यात राष्ट्रवादी मधून भाजप मध्ये आलेल्या अनुराधा चव्हाण, बागडे यांच्या खंदे समर्थक प्रदीप पाटील, विजय औताडे यांनी तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे पुन्हा निवडणुक लढवण्यास इच्छुक असलेल्या बागडे यांनी गेल्या आठवड्याभरापासून मतदारसंघात ठाण मांडून होते. गावा-गावात जाऊन त्यांनी केलेल्या विकास कामची चर्चा गावकऱ्यांशी केली.

याच माध्यमातून पक्षातून तिकिट न दिल्यास मतदारसंघातून जनमाणसाच्या माध्यमातून दबाव आणून तिकिट मिळवण्याची तयारीचा दुसरा फंडाही बागडे यांनी सुरु केल्याची चर्चा होत आहेत. वयावरून सुरु झालेले तिकिटाचे राजकारण सध्या फुलंब्री आणि औरंगाबाद तालुक्‍यात चर्चेचे विषय ठरू लागला आहेत. यात कितपत यश मिळेल हे विधानसभेच्या तोंडावर कळेल.

महत्वाच्या बातम्या