हरिभाऊ बागडेंनी हार-तुऱ्याला फाटा देत पुरग्रस्तांंसाठी जमवले २१ लाख रुपये

haribhau-bagade

औरंगाबाद : कोल्हापूर-सांगली येथील महापुरामूळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला. वाढदिवसानिमित्ताने लागणारे सर्व बॅनर, हार तुऱ्यांऐवजी पुरग्रस्तांना मदतीचे आवाहन बागडे यांनी केले होते. त्यास बागडे समर्थकांनी मोठा प्रतिसाद देत. कार्यकर्ते,सेवाभावी संस्था, पदाधिकाऱ्यांनी शनिवारी २१ लाख रुपये जमा केले.

दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि राज्यातील पुरपरिस्थितीची जाणिव ठेवून बागडे यांनी हा निर्णय घेतला होता. हा मदत निधी उभा करण्यासाठी चिकलठाणा एमआयडीसीतील सागर रिसोर्ट येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिीतीत अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.

बागडे यांच्या सुचनेवरून मागील काही दिवसांपासुन बाजार समिती सभापती राधाकिसन पठाडे,  संचालक तथा भाजप औरंगाबाद तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके आणि वाढदिवस संयोजन समितीकडून बागडे यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यास येणाऱ्यांना हार, पुष्पगुच्छ न आणता शक्य होईल तेवढी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शनिवारी अभिष्टचिंतन सोहळ्यात २१ लाख जमा झाले. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती पठाडे यांनी दिली.

यावेळी बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांचे प्रतीक असलेली सुंदर बैलगाडी भेट दिली. यावेळी सभापती श्री.पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे,संचालक दामु अण्णा नवपुते, रघुनाथ काळे, श्रीराम शेळके, सजनराव मते, भाऊसाहेब दहिहंडे, गणेश दहिहंडे, अजिंक्य मदगे, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेसच्या सरसाबाई वाघ यांच्यासह काही कॉग्रेस व राष्ट्रवादीचे सरपंच, उपसरपंचासह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.