fbpx

विठ्ठल नामाने दुमदुमली हडपसरनगरी

दाटला मेघ तु सावळा, मस्तकी चंदनाचा टीळा
लेऊनि तुळशी माळा गळा, पाहसी वाट त्या राऊळा

रंगीबेरंगी फुलांनी सजवलेला रथ, एेटबाज अश्व आणि माऊलीच्या नामस्मरणात एकरूप झालेले वारकरी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींंच्या पालखीचे हडपसर गाडीतळावर ९.४५ वाजता आगमन झाले. महापौर मुक्ता टिळक, माजी महापौर वैशाली बनकर यांनी स्वागत करून पादुकांची पूजा केली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शनवारी सुरु झाली. विठूनामाचा गजर आणि अभंग, भजनात तल्लीन होत टाळ- मुदुगांच्या तालात वारकरी विठ्ठल भेटीसाठी आतुर झाले आहेत.

दरम्यान, दुपारी १२ वाजेच्या सुमारास तुकाराम महाराजांची पालखी गाडीतळावरील विसाव्याच्या ठिकाणी आल्यानंतर, महापौरांनी पादुकांची पूजा केली. भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांग लावल्या होत्या. सुमारे एक तासाच्या विश्रांतीनंतर माऊलीची पालखी दुपारच्या विसाव्यासाठी उरुळी देवाचीकडे मार्गस्थ झाली.