हार्दिकचे ‘या’ कृतीमुळे होत आहे सर्वत्र कौतुक ; पाहा व्हिडीओ

hardik

श्रीलंका : एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ३८ धावांनी पराभव केला आहे.  यासह भारताने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपुर्ण संघ १२६ धावांवर अटोपला. या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादवने ३४ चेंडुत ५ चौकार आणि २ षटकारासंह सर्वाधीक ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात भुवनेश्वर कुमारला सामनावीर पुरस्कार दिला गेला. सामनावीर पुरस्कार भुवीला दिला असला तरीदेखील सर्वांची मने हार्दिक पंड्याने जिंकली.

झाले असे की, सामना सुरु होण्यापूर्वीच्या एका कृतीने हार्दिकने  सर्व श्रीलंकेच्या तसेच भारतीय चाहत्यांचे मन जिंकले. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशातील खेळाडू राष्ट्रगीतासाठी उभे होते. भारताचे राष्ट्रगीत झाल्यावर यजमान श्रीलंकेचे राष्ट्रगीत सुरू झाले यावेळी हार्दिक लंकेचे राष्ट्रगीत गाताना दिसला.

हार्दिक श्रीलंकेचे राष्ट्रगीत गात असल्याचे पाहून सोशल मीडियावर अनेकांनी त्याचे कौतुक केले. फक्त श्रीलंका नाही तर भारतीय चाहत्यांनी देखील त्याचे कौतुक केले. त्यांचा हा कॅमेरात कैद झालेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच त्याचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या