fbpx

रंगेल हार्दिक-राहुलच्या अडचणीत वाढ, २ सामन्यांच्या बंदीची शिफारस

मुंबई : कॉफी विद करण या टीव्ही शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बीसीसीआयने नोटीस पाठवत 24 तासात उत्तर मागितलं होतं. पण विनोद राय दोघांच्याही स्पष्टीकरणाने समाधानी झालेले नाहीत. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी या दोन्ही खेळाडूंवर २ मॅचच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवला आहे.

कॉफी विथ करण या शोमध्ये हार्दिक पांड्यानं त्याच्या सेक्स लाईफ बद्दल वादग्रस्त वक्तव्य केली होती. यानंतर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं पांड्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर हार्दिक पांड्यानं दिलगिरी व्यक्त केली आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही, असं सांगितलं.

माझ्या शिफारशीनुसार या दोन खेळाडूंवर दोन सामन्यांसाठी बंदी घालता येऊ शकेल काय, याबाबत डायना इडुल्जी यांनी कायदेशीर सल्ला मागितला आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यास बंदीबाबतचा निर्णय होऊ शकेल, असं राय यांनी म्हटलं आहे. मला विचाराल तर ही वक्तव्यं मुर्खपणाची, वाईट आणि स्वीकारण्याजोगी नाहीत, अशी प्रतिक्रियाही राय यांनी दिलीय.