मौत और कफ़न बाँध कर चल रहा हूँ, सलाखों से नहीं डरता : हार्दिक पटेल

Hardik Patel, leader of India’s Patidar community, addresses during a public meeting after his return from Rajasthan’s Udaipur, in Himmatnagar

टीम महाराष्ट्र देशा : पाटीदार आरक्षण आंदोलना दरम्यान भाजप आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी, पाटीदार समाज नेता हार्दिक पटेल यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वीसनगर कोर्टाकडून हा निर्णय देण्यात आला आहे, हार्दिक पटेल यांच्यासह त्यांच्या आणखीन तीन समर्थकांना देखील या प्रकरणी दोषी ठरवण्यात आल आहे.

दरम्यान, या निकालावर हार्दिक पटेल याने ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘मौत और कफ़न बाँध कर चल रहा हूँ।सलाखों से नहीं डरता,बात अगर मेरी होती तो बैठ जाता घर में,लेकिन बात करोड़ों ग़रीब लोगों की हैं’।अशा भावना हार्दिक पटेल याने व्यक्त केल्या आहेत.

२०१५ मध्ये संपूर्ण गुजरात राज्यात पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते, यावेळी भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती.

पी. चिदंबरम यांच्या घरी हिऱ्यांची चोरी