वाजवा रे वाजवा : हार्दिक पटेल लवकरच बोहल्यावर चढणार

अहमदाबाद : २७ जानेवारी रोजी गुजरातचा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकणार आहे. सुरतच्या किंजल पटेलसोबत सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या डिगसरमध्ये हार्दिकचा लग्नसोहळा पार पडणार असल्याची माहिती हार्दिकचे वडील भारतभाई पटेल आणि निकटवर्तीय निखील सवानी यांनी दिली.

पटेल आणि पारीख कुटुंबीयांमध्ये उत्तम संबंध आहेत. किंजल ही कॉमर्स शाखेची पदवीधर असून सध्या गांधीनगरमधील एका लॉ कॉलेजातून एलएलबी करत आहे.

दोन दिवसांचा हा लग्नसोहळा असणार आहे. पारंपरिक आणि साध्या पद्धतीने लग्न होणार आहे. किंजल हार्दिकपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसर गाव येथे हा मंगल सोहळा पार पडणार आहे.

हा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा केला जाईल.विवाहाचे सर्व विधी पटेल कुटुंबीयांचे कुलदैवत असलेल्या बहुचर आणि मेल्दी माता मंदिरात होतील, अशी ही माहिती मिळते.