व्हायरल सेक्स व्हिडिओ नंतर कॉंग्रेसचा हार्दीकला ९ जागा सोडण्यास नकार

rahul-hardik,rahul gandhi

टीम महाराष्ट्र देशा – पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेलचे लागोपाठ व्हिडिओ व्हायरल झाल्याने हार्दिकचं गुजरातमधील राजकीय वजन घटलं असल्याची चर्चा असून हार्दिक पटेलच्या गटाला (समितीला) जास्तीत जास्त तिकीट देण्याचं आश्वासन देणाऱ्या काँग्रेसने आता हात आखडता घेतला आहे. या समितीने केलेली ९ जागांची मागणी काँग्रेसने धुडकावून लावली असून त्यांना केवळ चार जागा देण्याचाच प्रस्ताव काँग्रेसने ठेवला आहे.

गुजरातमध्ये ९ मतदारसंघात पाटीदार समाजाचं वर्चस्व असल्याने या नऊ जागा समितीला सोडाव्यात असा प्रस्ताव समितीने काँग्रेस समोर ठेवला. त्यात अहमदाबाद, उत्तर गुजरात आणि सौराष्ट्रमधील जागांचा समावेश आहे. मात्र समितीने सादर केलेला हा ९ जागांचा प्रस्ताव काँग्रेसने सपशेल फेटाळून लावला. हार्दिकचा व्हिडिओ आल्यानंतरच काँग्रेस ९ जागा देण्यास तयार नसल्याचं समितीच्या नेत्यांचं म्हणणं आहे.