fbpx

हार्दिक पटेलच्या तरुणीसोबतच्या कथित व्हिडीओने गुजरातमध्ये राजकारण तापलं

टीम महाराष्ट्र देशा – पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा एक व्हिडीओ समोर आल्याने निवडणुकीमुळे तापलेल्या गुजरातमध्ये आता जोरदार खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र देशा व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती हार्दिकच आहे का? याची पुष्टी करत नाही.मात्र हा व्हिडीओ पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा असल्याचा प्रचार, सध्या सोशल मिडीयावरून सुरु झाला आहे.हार्दिकच्या विरोधकांकडून हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणावर शेअर केला जात आहे.

या व्हिडीओत एका बेडरुममध्ये एक मुलगी आहे. त्या मुलीसोबत असणारी व्यक्ती हा हार्दिक पटेल असल्याचा दावा विरोधकांकडून होत आहे. हार्दिकने मात्र हे घाणेरडं राजकारण असल्याचा दावा केला आहे.माझ्याविरुद्ध षडयंत्र  रचण्यात येत असून हा महिलांचा अपमान असल्याची टीका हार्दिकने केली आहे.