हार्दिक पटेल करेल संघ पद्धतीने प्रचार, पटेल संघाचा माजी स्वयंसेवक

भाजपाला त्यांच्यात भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीती

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात मैदानात उतरणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रणनीतीचा वापर करणार आहेत. हार्दिक पटेलने आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेसाठी काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत पाटीदार समितीला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे कदाचित हार्दिक पटेलने संघाच्या पद्धतीने काम करण्याचे ठरविले असावे.

लवकरच हार्दिक पटेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर पाटीदार अनामत आंदोलन समितीचे प्रचारक तयार करणार आहेत. हे प्रचारक राज्यभरात संघ पद्धतीने प्रचार करून भाजपाकडून करण्यात येणाऱ्या खोट्या विकासाच्या दाव्यांबद्दल आणि भाजपाच्या धार्मिक राजकारणाविरोधात लोकांमध्ये जनजागृती करतील. तसेच त्यासाठी सुरूवातीला पाटीदार समितीच्या २,४९० प्रचारकांची फळी उभारण्यात येईल. त्यासाठी तालुका स्तरावर प्रत्येकी २५६ प्रचारकांची फळी तयार करण्यात येईल, असे हार्दिक पटेल यांनी स्पष्ट केले.

You might also like
Comments
Loading...