भारताचं दुर्दैव,पाकिस्तानची भीती दाखवणारे दुबळे पंतप्रधान लाभले- हार्दिक पटेल

भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस पाकिस्तानची मदत घेत असल्याच्या मोदींच्या आरोपांचा हार्दिकने घेतला समाचार

टीम महाराष्ट्र देशा- गेल्या ७० वर्षात पाकिस्तान हिदुस्थानचे काहीही वाईट करू शकला नाही पण आता मोदी, जे आपले पंतप्रधान आहेत. तेच देशातील जनतेला पाकिस्तानची भीती दाखवत आहेत. आपल्या देशाला असे दुबळे पंतप्रधान मिळाले आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे अशी बोचरी टीका पाटिदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केली आहे. गुजरात निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस पाकिस्तानची मदत घेत असल्याच्या आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. देशातील जनतेला पाकिस्तानची भीती दाखवत असल्याची टीका हार्दिक यांनी टि्वटरवरून पंतप्रधानांवर टीका केली आहे.