fbpx

त्या व्हिडिओमध्ये असलेल्या व्यक्तीला शोधून काढतो,१० कोटी द्या- हार्दिक पटेल

टीम महाराष्ट्र देशा – व्हायरल सेक्स व्हिडिओमध्ये असलेला व्यक्ती कोण आहे, हे मला माहीत नाही. त्या व्हिडिओतील व्यक्तीला शोधायचे आहे. त्यासाठी मला किमान दहा कोटी रूपये द्या, अशी मागणी पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी केली.’माझी बदनामी करण्यासाठीच सेक्स व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. आमच्या आंदोलनाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र होतं,’ असा आरोप देखील पटेल यांनी केला आहे.

गुजरात निवडणुकीच्या आधी कथित व्हायरल सेक्स व्हिडिओमुळे गुजरातच्या राजकारणात उलथापालथ होताना पहायला मिळत असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना पहायला मिळत आहेत . ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत हार्दिकने त्या व्हिडिओतील व्यक्तीला शोधण्यासाठी मला किमान दहा कोटी रूपये द्या, ही मागणी केली आहे. ‘सत्तेत राहण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते. भाजपचं घाणेरडं राजकारण हा भारतीय राजकारणाचा एक भाग बनला आहे. त्यामुळे सेक्स व्हिडिओची मला जराही चिंता वाटत नसल्याचं हार्दिकने स्पष्ट केलं आहे.