दहा आमदार घेवून या; हार्दिक पटेलची गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांना खुली ऑफर

टीम महाराष्ट्र देशा: गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना मनासारखी खाती मिळाली नसल्याने ते नाराज असल्याच दिसत आहे. हीच संधी साधत पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पेटल यांनी नितीन पटेलांना कॉंग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे.

नितीन पटेल यांनी दहा आमदारांना घेवून कॉंग्रेसमध्ये याव त्यांना मनासारखी पदे दिली जातील, आपण यासाठी कॉंग्रेस नेत्यांशी बोलू अस हार्दिक यांनी सांगितल आहे. पाटीदार अनामत आंदोलनाच्या बैठकीपूर्वी ते बोलत होते.

गुजरातमध्ये भाजपची सत्ता स्थापन होवून अवघे तीन दिवस झाले आहेत. मात्र उपमुख्यमंत्री असणारे नितीन पटेल यांना हवी असलेली खाती देण्यात न आल्याने ते नाराज असल्याच बोलल जात आहे.