स्मृती इराणी आता पंतप्रधान मोदींना बांगड्या पाठवतील का?: हार्दिक पटेल

दिल्लीतील निर्भया अत्याचार प्रकरणानंतर आताच्या मंत्री असणाऱ्या स्मृती इराणी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या, त्यामुळे आता देखील उन्नाव आणि कठुआमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर स्मृती इराणी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बांगड्या पाठवणार का? असा सवाल पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी केला आहे.

सध्या देशातील सामाजिक राजकीय वातावरण उन्नाव आणि कठुआमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनांनी ढवळून निघाले आहे. याच मुद्यावरून हार्दिक पटेल यांनी स्मृती इराणी यांच्यावर निशाना साधला आहे. उन्नाव आणि कठुआमधील बलात्काराच्या घटनेनंतर स्मृती इराणी गप्प का? आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या घोषणा देतात. दुसरीकडे भाजपाच्याच राज्यात महिला सुरक्षित नसल्याची टीका हार्दिक पटेल यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.