२४ तासाच्या आतच हार्दिक पटेलचा दुसरा व्हिडीओ व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा – पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा एक व्हिडीओ समोर आल्याने निवडणुकीमुळे तापलेल्या गुजरातमध्ये आता जोरदार खळबळ उडाली आहे , अशात आता 24 तासाच्या आताच हार्दिक पटेलचा दुसरा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र देशा या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती हार्दिकच आहे का? याची पुष्टी करत नाही.मात्र हा व्हिडीओ पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा असल्याचा प्रचार, सध्या सोशल मिडीयावरून सुरु झाला आहे.हार्दिकच्या विरोधकांकडून हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणावर शेअर केला जात आहे.

या व्हिडीओत आता हार्दिक पटेल बरोबर एक मुलगी आणि अजून दोन व्यक्ती दिसत आहेत. त्या व्हिडीओ मध्ये असणारी व्यक्ती हा हार्दिक पटेल असल्याचा दावा विरोधकांकडून होत आहे. हार्दिकने मात्र हे घाणेरडं राजकारण असल्याचा दावा केला आहे.माझ्याविरुद्ध षडयंत्र रचण्यात येत असून हा महिलांचा अपमान असल्याची टीका हार्दिकने केली आहे. तर हे भाजप कडून बदनामीची खेळी आणि खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याची टिका देखील हार्दिक पटेल याने केली आहे.

bagdure

दरम्यान, अशाप्रकारचे व्हिडीओ माझ्या बदनामीसाठी भाजपकडून येऊ शकतात अशी शंका हार्दिकने यापूर्वीच व्यक्त केली होती.

You might also like
Comments
Loading...