fbpx

कोण आंबेडकर ? विचारणाऱ्या हार्दिक पांड्याला दणका

babasaheb aambedkar vs hardik pandya

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भातील ट्वीट मुळे हार्दिक पांड्या चर्चेत आला आहे. आपल्या धडाकेबाज फलंदाजी साठी ओळखल्या जाणाऱ्या हार्दिक पांड्याविरोधात जोधपूरच्या एका अनुसूचित जाती-जमातीच्या न्यायालयानं एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

याचिकाकर्ते डी. आर. मेघवाल यांच्या मते, 26 डिसेंबर 2017ला हार्दिक पांड्यानं स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. ज्यात हे ट्विट करून त्यानं डॉ. आंबेडकरांचा अपमान केला असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या या वादग्रस्त विधानामुळे अनेक दलित बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं याचीकाकार्त्याचं म्हणणे आहे.

हार्दिक पांड्यानं ट्विटमध्ये काय म्हटलं होतं ?
कोण आंबेडकर ?, ज्यांनी देशाच्या संविधानाचा मसुदा तयार केला आणि देशाला आरक्षण नावाचा आजार दिला.

याचिकाकर्ते डी. आर. मेघवाल यांचा नेमकं काय म्हणणं आहे ?
एखाद्या क्रिकेटपटूनं अशा प्रकारची टिप्पणी करणे हा तर संविधानाचा अपमान आहेच. पण त्याचबरोबर त्यांनी दलित बांधवांच्या भावनाही दुखावल्या आहेत, असंही मेघवाल यांनी याचिकेत नमूद केलं आहे. हार्दिक पांड्याच्या या ट्विटबाबत मला जानेवारीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली. हार्दिक पांड्याची ही टिप्पणी म्हणजे दलित बांधवांच्या भावना भडकावण्याचाच एक प्रकार असल्याचंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

4 Comments

Click here to post a comment