निराशाजनक कामगिरीमुळे सोशल मीडियावर हार्दिक पांड्या पुन्हा ट्रोल

hardik

श्रीलंका : एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ३८ धावांनी पराभव केला आहे. भारताने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपुर्ण संघ १२६ धावांवर अटोपला. यासह भारताने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याची कामगिरी निराशाजन होती. एकदिवशीय सामन्याप्रमाणेच या सामन्यातही हार्दिकचा फॉर्म दिसला नाही.

हार्दिकच्या टी-२० सामन्यातली कामगिरी पाहून चाहते पुन्हा निराश झाले आहेत. त्याच्या या कामगिरीनंतर मात्र त्याच्यावर सर्वत्र टीका होताना दिसत आहेत. या निराशजनक कामगिरीमुळे पुन्हा एकदा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. नेटकरी सोशल मीडियावर मिम्स शेअर करत हार्दिकला जोरदार ट्रोल करत आहेत.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 सामन्यात क्रिकेटरसिकांना अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, त्याने क्रिकेच रसिकांची निराश केली आहे. एकदिवसीय सामन्यतही पांड्याने चमक दाखवली नव्हती.

या टी-20 सामन्यात सुर्यकुमार यादवने ३४ चेंडुत ५ चौकार आणि २ षटकारासंह सर्वाधीक ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. तर सूर्यकुमार यादवनंतर फलंदाजीसाठी आलेल्या पांड्याने 12 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. गोलंदाजीतही त्याने चमक दाखवली नाही. तसेच क्षेत्ररक्षण करताना त्याने एक झेलही सोडला. त्यामुळे पांड्या ट्रोल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या